आपल्या देशात जगातील सर्वात जास्त पशुधन आहे. त्याचबरोबर भारत हा जगातील सर्वात जास्त दुधाचे उत्पादन करतो. मांस, बीफ आणि अंड्यांच्या उत्पादनातही भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करतोय. दूध, अंडी आणि मांस हे प्राणी आणि पक्षी यांवरआधारित व्यवसाय आहेत. या प्राणी आणि पक्षांना परोपजीवी किड्यांमुळे मोठा धोका असतो. गोचीड, उवा, लिखा, पिसवा यासारखे परोपजीवी किडे प्राण्याचे रक्त शोषतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी करतात आणि रोगांचा प्रसारदेखील करतात. यामुळे प्राणी आणि पक्षांची उत्पादनक्षमता लक्षणीयरीत्या कमी होते. यामुळे प्राणी/पक्षी मरतोदेखील.
या परोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी सध्या वेगवेगळे रासायनिक कीटकनाशके वापरले जातात. ही रसायने प्राण्यांमध्ये शोषले जातात. दुधातून, माणसातून आणि अंड्यातून ते आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन पोहोचतात. या रासायनिक कीटकनाशकांमुळे प्राण्यांच्या आणि माणसाच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. पक्षी/प्राण्यांना रसायने, किडे यापासून मुक्त करण्यासाठी आम्ही गोचीड-गो हे सेंद्रिय, पर्यावरणपुरक उत्पादन विकसित केले आहे. गोचीड-गो हे तीन प्रकारात उपलब्ध आहेत: १. गोचीड-गो (एल) 2. गोचीड-गो (पी) 3. गोचीड-गो (पेट)Animal Care Division

8D,Raisoni Industrial Park, Rajiv Gandhi IT-BT Park,Phase-II, Village Maan, Hinjewadi, Pune, Maharashtra - 411057
+91-20-67919200
Email : info@greenvisionindia.com